शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

धानाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव घोषित करा

By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST

आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही,

सावली : आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही, अवेळी अपुऱ्या व कमी पावसाने शेतरकरी त्रस्त आहे. त्यातच निर्यात बंदीमुळे शासनाचे हमी भाव देखील घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव शासनाने घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-विदर्भ भागात असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तथा नागपूर जिल्ह्याच्या काही भागातील धान ुउत्पादकांच्या प्रश्नावर खा. अशोक नेते म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे धानपिक हे मुख्य पीक आहे. गडचिरोली सारख्या अतिमागास जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नाहीत. मागील खरीपात विलंबाने व अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे व धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या धानाला भाव कमी मिळत आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, थायलंड हे धानाचे प्रमुख निर्यात देश आहेत. परंतु, आता या देशाच्या स्पर्धेत काही इतर देश सहभागी झाले असून कमी दराने भाताची निर्यात करीत आहेत. त्यातच इराण व इराक भाताची आयात करणाऱ्या देशानी मार्च अखेर पर्यंत आयात बंद केली आहे. त्यामुळे भारतातील भाताची निर्यात रखडलेली आहे. परिणामी धानाचे हमीभाव कमी झाले आहे.व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने धान विकावे लागत आहे. त्यामुळे गरीब शेतकरी लाचार व हवालदील झाला असून सामान्य व इतर शेतकऱ्यांचा माल योग्य दराच्या प्रतीक्षेत घरी अथवा गोडावूनमध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी धानाला उत्पादन खर्चावर हमी भाव शासनाने जाहीर करावा अशी सूचना लोकसभा अध्यक्षामार्फत खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यामुळे केंद्र शासन त्यांच्या सूचनेची दखल घेऊन हमी भाव जाहीर करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)