शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रस्ता तलाठ्याने विकल्याचा आरोप

By admin | Updated: July 7, 2014 23:29 IST

शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे. बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण

गावकऱ्यांची तक्रार : विरोध करणाऱ्यांना दिली धमकीराजुरा : शासकीय रस्ता तलाठ्याने परस्पर विकला असल्याचा आरोप बामणवाडा येथील नागरिकांनी केला आहे.बामणवाडा वॉर्ड क्रमांक एक बिरसामुंडानगर येथील आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण संस्था असून २५ ते ३० प्लॉटधारक व इतर २० ते ३० कुटुंब वास्तव्य करीत आहेत. गृहनिर्माण संस्थेचा मंजुर ले-आऊट असून त्यामध्ये एकंदर ३२ प्लॉट आहेत. प्लॉट क्रमांक सात हा राजुरा- चुनाळा मुख्य रस्त्याला लागून असून पश्चिमेला दसवारु नाल्याच्या किनाऱ्याला लागून २० ते २५ फूट सार्वजनिक सरकारी रस्ता आहे. त्या पलिकडे दसवारु नाला आहे. वास्तविक सात क्रमांका प्लॉट हा ४३२ चौरस मिटर आहे. परंतु गैरअर्जदाराने त्यांच्याकडून प्लॉट खरेदी केलेला आहे. ते तलाठी असल्यामुळे प्लॉटचे बनावट दस्तावेज तयार करुन जास्तीची जागा दाखिविली आहे. प्रत्यक्षात गैरअर्जदाराने दसवारु नाल्याकडून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करुन स्वत: सिमांकन दर्शविणारा दगड गाडलेला आहे. संपूर्ण प्लॉटधारकांची वहीवाट तसेच रस्ता नाल्ययाला लागून सरकारी जमिनीतून आहे. सदर वहीवाट २५ ते ३० वर्षापासून आहे. तलाठ्याने आपल्या बळाचा व पदाचा गैरवापर करुन सरकारी जमिनीवरील वहीवाट असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. ग्रामस्थाने समजविण्याचा प्रयत्न केला असता, विक्री करुन देणाऱ्या तलाठ्याने आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही, इथून कसे रस्त्याने जाता ते बघून घेवून, अशी धमकी देवून, दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सन २००८ मध्ये तलाठ्याने प्लॉट क्रं. सातसह सरकारी जागेवरील वहीवाट असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करुन घर बांधकाम सुरु केलेले होते. परंतु बामणवाडा ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंचांनी एका पत्राद्वारे सदर घराचे बांधकाम बंद करण्यास सूचविले होते व प्लॉट क्र. सातचे दस्तऐवज मूळ नकाशासह बामणवाडा ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्याचे सूचविण्यात आले. परंतु तलाठी यांनी घराचे सदर घराचे बांधकाम बंद करुन परस्पर प्लॉट क्रमांक सातची विक्री करुन दिली. त्यांनाही सरकारी रस्त्यावर आपली जागा असल्याचे भासवून खोटे दस्ताऐवज तयार करण्यात आले आणि प्लॉट क्रमांक सातचा पुरावा बामणवाडा ग्रामपंचायतीला सादर केलेला नाही. १४ जुलै २००८ ला झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील विषय क्रं. सातमधील ठराव क्रं. ७/२ अन्वये चार मीटर बाय १५० मिटर लांबीचा रस्ता सामान्य सेस फंडाच्या रकमेतून पूर्ण करण्यासाठी मासिक सभेची मंजुरी प्रदान केलेली आहे. परंतु सदरहू प्लॉटधारक रस्त्यावर अतिक्रमण करुन वहीवाट असलेला रस्ता बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे.त्यामुळे त्वरीत कार्यवाही करुन सरकारी जमिनीवरील वहीवाट असणाऱ्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण संस्था बिरसामुंडानगर येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा नाईलाजास्त तीन दिवसात सर्व सभासद व बिरसामुंडा नगरवासिय आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या वॉर्डातील रहिवाशांनी दिला आहे. निवेदनावर मधुकर कोटनाके, शामराव चंदनखेडे, डॉ. बुऱ्हान, तिवारी, रामभाऊ देवईकर, संतोष हुसूकले, पृथ्वीराज कटेरे, रिंकु मरस्कोल्हे, लक्ष्मण कुमरे, एस.ए. चिडे, मडावी, सुधाकर बुऱ्हाण, देवानंद राजीकर, आत्माराम खेडेकर यांच्यासह परिसरातील ५० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर प्रतिनिधी)