शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या संपर्कातील पाचही अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे बुधवारी घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेटजवळ चंद्रपूर येथील एक युवती संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदर रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन मात्र कायम : बिनबा गेट परिसरात बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १३ मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यातील अती जोखमीच्या पाच नातेवाईकांपैकी पाचही जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सध्या नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे बुधवारी घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेटजवळ चंद्रपूर येथील एक युवती संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदर रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. १३ मे रोजी या व्यक्तीच्या संपर्कातील पाच रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या पाच लोकांचे प्रतीक्षेत असणारे स्वॅब नमुने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.बिनबा गेट परिसरातील नव्या रुग्णाच्या संपर्कातील दहा व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी पाच लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. बिनबा गेट परिसरातील रूग्णदेखील चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असून तिची प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील एकूण १९० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी एकूण ७२८ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व माहिती घेण्यात येत आहे.तर २ मे रोजी आढळलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आतापर्यंत घेण्यात आलेल्या ५५ नागरिकांच्या नमुन्यांपैकी ५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. दोन नमुने प्रतीक्षेत आहे. या परिसरातील दोन हजार १५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून आठ हजार ५४० नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी २ मेपासून सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा संशयित रुग्ण या परिसरात आढळलेला नाही.संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-१९ ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ३०० आहे.यापैकी दोन नागरिक पॉझिटीव्ह निघाले असून २७२ नागरिक निगेटीव्ह आहे. २६ नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.लॉकडाऊननंतरही काही दुकाने उघडीचचंद्रपुरात दुसरा कोरोना रुग्ण मिळाल्यानंतर प्रशासनाने गुरुवारपासून लॉकडाऊनमधील शिथिलता थांबवून केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली. मात्र गुरुवारी जीवनावश्यक वस्तूंसह अनेक दुकाने अर्थवट शटर उघडून सुरू करण्यात आली होती. अर्धवट उघडलेल्या या दुकानांमध्ये ग्राहकही येताना दिसून येत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या