दारूबंदी जिल्ह्यातून दारू वाहतुकीला परवानगी देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:48+5:302021-02-05T07:38:48+5:30

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या तीनही जिल्ह्यात दारूबंदी आहे. परंतु लगतच्या जिल्ह्यात दारू सुरू आहे. त्या जिल्ह्यातील दारूची मागणी पूर्ण ...

Alcohol should not be allowed in the district | दारूबंदी जिल्ह्यातून दारू वाहतुकीला परवानगी देऊ नये

दारूबंदी जिल्ह्यातून दारू वाहतुकीला परवानगी देऊ नये

चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या तीनही जिल्ह्यात दारूबंदी आहे. परंतु लगतच्या जिल्ह्यात दारू सुरू आहे. त्या जिल्ह्यातील दारूची मागणी पूर्ण करण्यासाठी नागपूरसह इतर ठिकाणाहून दारूची मोठी वाहतूक होत आहे. ही दारूची वाहने दारूबंदी असलेल्या चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातून होत संबंधित जिल्ह्यात पोहचती केली जात आहेत. याचाच गैरफायदा दारू तस्करांनी घेतला आहे. मोठ्या मद्यविक्रेत्यांना हाताशी धरून खोटा दारू वाहतुकीचा परवाना टी.पी. बनवून पोलिसांची दिशाभूल करत दारूबंदी जिल्ह्यात दारू पोहचविण्याची शक्कल लढवली आहे. दारू पकडल्या गेल्यास परवाना दाखवून रस्ता चुकल्याची बतावणी करत वाहने सोडवून घेतली जात आहेत, असे अनेक प्रकार समोर आले आहेत. दारू वाहतुकीचा परवाना असल्याने पोलिसांनाही नाईलाजास्तव वाहने सोडावी लागत आहेत, याकडे आमदार जोरगेवारांनी लक्ष वेधले आहे. अनेक वर्षांपासून असाच प्रकार सुरू असल्याने दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूचा महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गुन्हेगारीत वाढ

या व्यवसायात गुंड प्रवृत्ती शिरल्याने गुन्हेगारीच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले व महिला या धंद्यात गुंतल्या गेल्याने बाल गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कठोर पावले उचलण्याची गरजही आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Alcohol should not be allowed in the district