कोरोनाच्या सावटात मशागतीचीे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:43+5:30

ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे.

Agriculture works in the shadow of Corona | कोरोनाच्या सावटात मशागतीचीे कामे

कोरोनाच्या सावटात मशागतीचीे कामे

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगामावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनाचे थैमान सुरु आहे. राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती पुढे नियंत्रणात आली नाही, तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटात शेती मशागतीचे कामे सुरू केली आहे.
ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे. शेती पेरणीसाठी सज्ज करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करतात. यासाठी आणखी दीड महिना वेळ आहे.
परंतु येत्या दीड महिन्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का, या प्रश्नाचे उत्तर अद्यापतरी कुणीही देत नाही. हंगाम जवळ आल्याने शेतकºयांची लगबग वाढली आहे. मे महिन्यात जर कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २० मे नंतर शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यावेळी जर कोरोना आटोक्यात आला नाही तर सोशल डिस्टंन्सिगची मोठी समस्या उद्भवणार आहे.
दुसरीकडे कृषी विक्रेतेही चिंतेत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांकडून मागणी होणाºया वेगवेगळ्या दर्जाचे, कंपनीचे बियाणे व खते कृषी विक्रेते उपलब्ध करुन देतात. मात्र लॉकडाऊन असाच कायम राहीला आणि वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन आणखी तीव्र करण्यात आला. तर कंपन्यांकडून खते व बियाणांचा पुरवठा होईल का, अशी भीती कृषी विक्रेत्यांनासध्या सतावत आहे.

संकटांची मालिका सुरूच
चालू वर्ष शेतकºयांसाठी वाईट ठरत आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरी अवकाळी पाऊस थांबलेला नाही. मागील हंगामात दिवाळीनंतरही अवकाळी पाऊस सुरुच होता. त्यामुळे सोयाबिन पिकाचे नुकसान झाले. कापूस, भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला. या संकटातून शेतकरी सावरत असतानाच, कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटाचे लवकर सुटका मिळावी अशी प्रार्थना सध्याशेतकरी करीत आहेत.
कापूस विक्रीसाठी शेतकरी चिंतेत
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, देशपातळीवर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. खासगी जिनिंगही बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आहे. तो विकल्याशिवाय हाती पैसे येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामासाठी लागणारे खते-बियाणे खरेदींची अडचण वाढली आहे.

Web Title: Agriculture works in the shadow of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.