शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा कायद्याच्या निधीत 'अघोरी' प्रकार; अनुभवी संस्था व कार्यकर्त्यांना ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:34 IST

Chandrapur : महाराष्ट्रात नरबळी आणि अघोरी प्रथांविरुद्ध कडक कायदा होऊन दशकाहून अधिक काळ लोटला असला, तरी अंमलबजावणीपेक्षा निधीच्या वाटपातच शासनाला अधिक रस असल्याचे वास्तव समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
महाराष्ट्रात नरबळी आणि अघोरी प्रथांविरुद्ध कडक कायदा होऊन दशकाहून अधिक काळ लोटला असला, तरी अंमलबजावणीपेक्षा निधीच्या वाटपातच शासनाला अधिक रस असल्याचे वास्तव समोर आले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचारासाठी मंजूर झालेला १ कोटी ७७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी वाटप करताना ४४ वर्षांचा अनुभव असलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्थांना डावलून मर्जीतील संस्थांना या कामाचे कंत्राट वाटप केल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे.

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 'जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती' स्थापन केली आहे. यात प्रा. श्याम मानव यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्यभरात २३६ प्रशिक्षित वक्ते तयार केले. मात्र, यावर्षी निधी वितरित करताना समितीची कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३१ मार्च रोजी राज्यातील सात विशिष्ट संस्थांची निवड करून त्यांना निधीचे वाटप केले आहे. 

खान्देशच्या संस्थांना विदर्भाची जबाबदारी

धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील संस्थांना चक्क अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये जनजागृतीची कामे देण्यात आली आहेत. श्री सत्य साई सेवा मंडळ (जळगाव) संस्थेला अमरावती विभागातील ५ जिल्हे, जोगाईमाता सांस्कृतिक मंडळ (धुळे) ला नाशिक विभागातील ५ जिल्हे, आई देवमोगरा महिला मंडळ (धुळे) ला नागपूर विभागातील सहा जिल्हे दिले आहेत. यामुळे स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या आणि स्थानिक बोलीभाषा व प्रथांची माहिती असलेल्या अनुभवी संस्थांना डावलून बाहेरच्या जिल्ह्यातील संस्थांवर ही मेहेरबानी का? असा प्रश्न विचारला जात आहे.

"ज्या कायद्यासाठी ४४ वर्षे संघर्ष केला, त्या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी अनुभवी संस्थांना डावलून मर्जीतील संस्थांना कोट्यवधींचा निधी वाटणे हा पुरोगामी चळवळीचा अपमान आहे. राज्य समितीची बैठक न घेता, विदर्भातील कामांची जबाबदारी खान्देशातील संस्थांना देऊन पारदर्शकतेचा बळी दिला आहे. शासनाने स्वतः प्रशिक्षित केलेल्या २३६ वक्त्यांना काम न देणे म्हणजे सरकारी तिजोरीचा अपव्यय आणि भोंदूगिरीला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखेच आहे."
- हरिभाऊ पाथोडे, राज्य संघटक व सदस्य, राज्य जादूटोणाविरोधी प्रचार समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Magic Act Law Funds: Favoritism Alleged, Experienced Groups Ignored.

Web Summary : Maharashtra's anti-superstition law faces scrutiny as funding favors select organizations, sidelining experienced groups like अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती. Critics question transparency, citing regional discrepancies in fund allocation and neglect of trained speakers.
टॅग्स :fundsनिधीGovernmentसरकार