शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

मुंबईवरून आलेला मौजा आरवट येथील २५ वर्षाच्या युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता. तो सकारात्मक निघाला आहे.

ठळक मुद्देआता रुग्णसंख्या २१ : विसापूर, चंद्रपूर, आरवट, चिरोली, विरव्हा, दुर्गापूर प्रत्येकी एक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २४ मे रोजी सकाळी दोन रुग्णाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी वाढून २१ झाली आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.मुंबईवरून आलेला मौजा आरवट येथील २५ वर्षाच्या युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता. तो सकारात्मक निघाला आहे.घुग्घुस येथील २५ वर्षीय महिला १४ मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम क्वारंटाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे २२ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. २२ रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह आले आहे.नाशिक-मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीही पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम क्वारंटाइन होता. २१ मे रोजी लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याला स्वॅब अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक २४ वर्षीय युवक ११ मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम क्वारंटाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. त्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आईदेखील बाधित झाली आहे. ती सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. २२ मे रोजी या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह निघाले.असे आढळले रुग्णयापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २ मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर १३ मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. २० व २१ मे रोजी एकूण १० रुग्ण आढळले. त्यानंतर २३ मे रोजी पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १५ झाली. २३ मे रोजी मध्यरात्री चार नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानंतर २४ मे रोजी पुन्हा दोन रुग्ण आढळले. एकूण २१ रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या