पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:19+5:30

मुंबईवरून आलेला मौजा आरवट येथील २५ वर्षाच्या युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता. तो सकारात्मक निघाला आहे.

Again six new patients were found | पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले

पुन्हा सहा नवे रुग्ण आढळले

Next
ठळक मुद्देआता रुग्णसंख्या २१ : विसापूर, चंद्रपूर, आरवट, चिरोली, विरव्हा, दुर्गापूर प्रत्येकी एक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २४ मे रोजी सकाळी दोन रुग्णाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी वाढून २१ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे च्या रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.
मुंबईवरून आलेला मौजा आरवट येथील २५ वर्षाच्या युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता. तो सकारात्मक निघाला आहे.
घुग्घुस येथील २५ वर्षीय महिला १४ मे रोजी पुण्यावरून आली होती. ती होम क्वारंटाइन होती. लक्षणे दिसून आल्यामुळे २२ मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. २२ रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह आले आहे.
नाशिक-मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीही पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम क्वारंटाइन होता. २१ मे रोजी लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याला स्वॅब अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक २४ वर्षीय युवक ११ मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम क्वारंटाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. त्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आईदेखील बाधित झाली आहे. ती सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. २२ मे रोजी या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह निघाले.

असे आढळले रुग्ण
यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २ मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर १३ मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. २० व २१ मे रोजी एकूण १० रुग्ण आढळले. त्यानंतर २३ मे रोजी पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १५ झाली. २३ मे रोजी मध्यरात्री चार नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानंतर २४ मे रोजी पुन्हा दोन रुग्ण आढळले. एकूण २१ रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

Web Title: Again six new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.