शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच पदाच्या आरक्षणानंतर अनेकांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

गोंडपिपरी : निवडणूक विभागामार्फत पार पडलेल्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणानंतर अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून बहुतांश ...

गोंडपिपरी : निवडणूक विभागामार्फत पार पडलेल्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणानंतर अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून बहुतांश जागेवर महिला आरक्षण निघाल्याने तालुक्यातील दिग्गज नेत्यांना याचा फटका बसला तर कुठे अपेक्षित आरक्षणात फेरबदल झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला असून तालुक्यात कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे.

शुक्रवारी स्थानिक पंचायत समिती सभागृहात तहसीलदार के. डी. मेश्राम तसेच संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील बहुसंख्येने नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य तथा राजकीय मंडळी उपस्थित होती. आरक्षणाची सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तथा सर्वसाधारण असे क्रमवार आरक्षणाची सोडत सुरू असताना गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वीच्या आरक्षणाच्या आधारे नुसार तसेच प्रवर्गनिहाय आरक्षण लाभलेल्या ग्रामपंचायतीला २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण नियमानुसार सोडत प्रक्रिया सुरू झाली. यात ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने प्रत्येक प्रवर्गामध्ये महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर अनेकांना महिला आरक्षणामुळे सरपंच पदापासून मुकावे लागले. तर महिला गटात आनंदाची लाट ओसरली. यावेळी आरक्षणाबाबत शंका-कुशंका असलेल्यांनी प्रश्न उपस्थित केले असता त्याची वेळीच निरासन करून तहसीलदार मेश्राम यांनी समाधान केले. तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४३ ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच त्याचा निकाल जाहीर झाला. उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात होणार असून त्याचे सरपंच पदासाठीचे आरक्षण पूर्वीच जाहीर झाल्याने येणारी निवडणूक लढविणाऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. तालुक्यात महिला आरक्षणाचा फटका अनेक दिग्गजांना बसला असून, तालुक्यातील गटातटाच्या राजकारणात ‘कही खुशी कही गम’ असे चित्र निर्माण झाले आहे.