शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यांच्या बदल्यांना अधीक्षक अभियंत्यांच्या मौखिक आदेशाचा अडसर

By admin | Updated: June 10, 2014 23:57 IST

येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातील २४ शाखा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश निघून आठवडा लोटला आहे. मात्र आठवडाभरानंतरही आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने येथील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

चंद्रपूर : येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातील २४ शाखा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश निघून आठवडा लोटला आहे. मात्र आठवडाभरानंतरही आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने येथील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कागदोपत्री आदेश निघाले असले तरी, या मंडळाचे अधीक्षक अभियंता जनबंधु यांच्या मौखिक आदेशामुळे पुढची प्रक्रिया त्यांच्या दालनातच रखडल्याची माहिती आहे.सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अंतर्गत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता-श्रेणी दोन या पदावरील अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी निघाले. यात २४ अभियंत्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. त्यातील सहा अभियंत्यांच्या बदल्या नक्षलग्रस्त क्षेत्रातील सेवेचा निकष लावून गडचिरोली जिल्ह्यात झाल्या आहेत. तर, उर्वारित १८ अभियंत्यांच्या बदल्या मंडळाअंतर्गत झाल्या आहेत. बदलीचे आदेश निघून आठवडा लोटला. संबंधितांचे आदेश कार्यकारी अभियंत्यांकडेही पोहोचले. मात्र त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ही प्रक्रिया जेवढी लांबविता येईल तेवढी लांबविण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरूनच सुरू असल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून यावर निर्णय घेण्यात विलंब होत असल्याची माहिती आहे. अनेकांच्या बदल्या इच्छेविरूद्ध झाल्याने त्या थांबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तर काही अभियंते आपल्या इच्छेप्रमाणे ठिकाण मिळविण्यासाठी धडपडत आहे. या मानसिकतेच्या पार्श्वभूमिवर अधीक्षक अभियंता जनबंधु यांनी मौखिक आदेश देवून पुढची प्रक्रिया थांबविल्याची माहिती आहे. या काळात बदल्यांच्या नाावाखाली घोडेबाजार सुरू झाल्याचीही चर्चा असून संबंधित अभियंत्यांना साहेबांच्या कार्यालयातील मर्जीतील लिपिकांकडून आणि हस्तकांकडून भेटीला येण्याचे निरोपही धाडले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात विदर्भातील बदल्यांची प्रक्रिया गाजत असतानाच यात चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळातील अनुभवाचीही भर पडली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम मंडळात अभियंत्यांच्या बदल्याचीच चर्चा सुरू आहे. एकीकडे अभियंत्यांना बदल्याची प्रतीक्षा असताना दुसरीकडे वरिष्ठांच्या मौखिक आदेशाने बदल्यांची प्रक्रीया का थांबविली, असा प्रश्न आहे. (जिल्हा प्रतिनिधी)