शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागातील अधीक्षकांचा वेतनश्रेणीसाठी संघर्ष कायम

By admin | Updated: December 23, 2016 00:45 IST

दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत

समान काम-समान वेतनाला बगल : दोन विभागांच्या कर्मचाऱ्यात भेदभाव चिमूर : दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत शासनाने आदिवासी आश्रम शाळा सुरु केल्या. मात्र या शाळांमध्ये अहोरात्र परिश्रम घेवून सेवा देणाऱ्या अधीक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. तर एकच काम करणाऱ्या अधीक्षकांना समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकापेक्षा वेतनश्रेणी कमी आहे. ही वेतनश्रेणी मधील तफावत दूर करण्यासाठी आदिवासी विभागातील आश्रम शाळेतील निवासी अधीक्षकांकडून मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरु आहे. गडचिरोली, गोंदिया या सारख्या नक्षलग्रस्त भागात आश्रम शाळेतून विद्यार्थ्याच्या शारिरीक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील अधीक्षकांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी शासन दरबारी प्रलंबीत आहेत. समान काम, समान वेतन या कायद्याप्रमाणे समाजकल्याण विभागाच्या अधीक्षकांच्या वेतन श्रेणी प्रमाणे आदिवासी विकास विभागातील अधीक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे, बारा वर्षे पूर्ण केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा जीआर तत्काळ लागू करावा, अनुदानीत आश्रम शाळेतील पदोन्नतीच्या संधी नसलेल्या एका पदाला सुधारीत ग्रेड वेतन लागू करण्याची मागणी एका निवासी आश्रमशाळेतील अधीक्षकांकडून मागील अनेक वर्षापासून निवेदनाद्वारे मागणी होत आहेत. मात्र त्यांची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. आश्रम शाळांचे अधीक्षक आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना निवासी राहून सेवा देत असून समाजकल्याण विभागातील अधीक्षकही तेच काम करतात. मात्र त्यांना ९३०० ची वेतन श्रेणी देण्यात येते. मात्र या हक्काच्या वेतन श्रेणी पासून आदिवासी विभागातील अधीक्षक वंचित आहेत. (प्रतिनिधी)