चंद्रपुरातील सहा दुकानांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:01:16+5:30

ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली.

Action for non-compliance with rules on six shops in Chandrapur | चंद्रपुरातील सहा दुकानांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई

चंद्रपुरातील सहा दुकानांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई

ठळक मुद्देसात दिवस राहणार बंद : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरावर वॉच

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वारंवार सूचना देण्यात आल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या सहा दुकानांवर मनपाने कारवाई केली. या सहाही दुकानांना पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी स्वत: आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात मनपा पथकाने केली.
कोरोना प्रतिबंधासाठी शासनातर्फे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर यावी, याकरिता मागील काही दिवसांपासून यात शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेतच दुकाने सुरु ठेवण्यात येत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. एकावेळी पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, दोन ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर पाळावे, विहित वेळेत दुकाने सुरु व बंद करावे, पूर्णत: स्वच्छता राखावी, यासारख्या अटी या लॉकडाऊन शिथिलता काळात पाळण्याचे दुकानदारांवर बंधन आहे. याबाबत मनपातर्फे वारंवार सूचना देण्यात आल्या आहे. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने आयुक्त राजेश मोहिते यांनी काही प्रतिष्ठानांना प्रत्यक्ष तपासणी करून कडक कारवाई केली. यावेळी उपायुक्त गजानन बोकडे, आशिष मोरे, राहुल पंचबुद्धे, संतोष गर्गेलवार उपस्थित होते.

ग्राहकांना बसू देणाऱ्या उपहारगृहांना दंड
ग्राहकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या चंद्रपुरातील कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहांवर मनपाच्या पथकाने बुधवारी दंडात्मक कारवाई केली. उपहारगृहे, खाद्यगृहे यात केवळ पार्सल देण्याच्या स्पष्ट सूचना असताना ग्राहकांना दुकानाच्या आत बसून खाद्यान्न खाऊ दिले जात आहे. बुधवारी मनपाच्या पथकाने शहरातील हॉटेल्सची पाहणी केली. यात कॅफे मद्रास व रसराज या उपहारगृहात ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. काही ग्राहक नाश्ता करतानाही दिसून आले. त्यामुळे या दोन्ही उपहारगृहांवर कारवाई करण्यात आली.
मनपाची मोहीम
कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता न पाळणाऱ्या व स्वत:सह इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवितानाच लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. त्यानुसार विविध नियमांचे भंग करणाऱ्या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणाºया व्यक्तींना दंड आकारण्यात येत आहे.

लॉकडाऊनमधे शिथिलता ही मंदावलेले आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी दिली गेली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेण्यात येऊ नये. मास्क घालणे, भौतिक दूरता पाळणे यासारख्या नियमांचे पालन व्हायलाच हवे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.
- राजेश मोहिते,
आयुक्त, मनपा, चंद्रपूर

Web Title: Action for non-compliance with rules on six shops in Chandrapur