शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अँटिजन रिपोर्ट असेल तरच मिळेल ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समालकांनी लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी चंद्रपूर येथून डीएनआर, पर्पल, हमसफर, गणराज, महाकाली अशा अनेक ट्रॅव्हल्स कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात धावत होत्या. परंतु, आता त्याला मर्यादा आली आहे. 

ठळक मुद्देखासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना कोरोनाची धास्ती : सॅनिटायझर, मास्क बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे प्रवासावरही निर्बंध आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवेसाठी काही खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. ज्या प्रवाशांकडे अँटिजन रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यालाच ट्रॅव्हल्स बसमध्ये बसण्याची परवानगी आहे. त्यातही मास्क व सॅनिटायझर बंधनकारक आहे. प्रवासी उतरल्यानंतर त्याच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येत आहेत. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. याची झळ खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनाही बसली आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्समालकांनी लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये घट केली आहे. कोरोनापूर्वी चंद्रपूर येथून डीएनआर, पर्पल, हमसफर, गणराज, महाकाली अशा अनेक ट्रॅव्हल्स कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात धावत होत्या. परंतु, आता त्याला मर्यादा आली आहे. चंद्रपूरवरुन केवळ नागपूर व पुणेसाठी दहाच्या जवळपास ट्रॅव्हल्स धावत आहेत. बाकी ट्रॅव्हल्स मागील दोन महिन्यांपासून बंदच आहेत. परिणामी कोरोनामुळे हा व्यवसाय डबघाईस आला आहे. प्रवासी मिळाल्यास एखादी फेरी धावते. त्यातही मोजक्याच प्रवाशांना प्रवेश असल्याने उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे चालक, क्लीनरचा पगार कसा करायचा असा प्रश्न दर महिन्याला ट्रॅव्हल्स मालकांना पडत आहे. दरम्यान, प्रवास करताना प्रवासीही स्वत:ची काळजी घेत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. चंद्रपूरवरून नागपूरकडे धावणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पाहणी केली असता यामध्ये मोजकेच प्रवासी आढळून आले. तसेच प्रवाशांनी मास्क वापरल्याचे दिसून आले. 

मास्कचा होतोय वापर शहरातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या जागेची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले. 

कारवाईसाठी नेमले पथकखासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. ट्रॅव्हल्सधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते. 

ई-पास बंधनकारकपरजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्या ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. जर प्रवाशांकडे इ-पास नसेल तर त्याच्या अँटिजन चाचणीचा अहवाल, आधार कार्ड आवश्यक आहे. तेव्हाच त्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या