शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

९९८ जण कोरोना पॉझिटिव्ह टु निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

भद्रावती वेकोलि कॉलनीतील कर्मचाऱ्याला रविवारी माजरी येथील वेकोलिच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जटपुरा वार्डातील मृतक व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. आजच्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर २९, मूल येथील ८, गोंडपिपरी येथील ३, भद्रावती ५, ब्रह्मपुरी दोन अशा एकूण ४७ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभद्रावती व चंद्रपूरात प्रत्येकी एक मृत्यू : सोमवारी ४७ रूग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या १४९५ वर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भद्रावती वेकोलि कॉलनीतील ५३ वर्षीय कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा रविवारी तर चंद्रपूर शहरातील जपटपुरा गेट परिसरातील ६५ वर्षी व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १७ झाली आहे. मृतक दोघेही न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते, अशी आरोग्य प्रशासनाने दिली. सोमवारी जिल्ह्यात ४७ रूग्ण आढळले. रूग्णांची संख्या १४९५ झाली तर उपचारानंतर ९९८ जणांना सुट्टी देण्यात आली आहे.भद्रावती वेकोलि कॉलनीतील कर्मचाऱ्याला रविवारी माजरी येथील वेकोलिच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जटपुरा वार्डातील मृतक व्यक्तीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. आजच्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर २९, मूल येथील ८, गोंडपिपरी येथील ३, भद्रावती ५, ब्रह्मपुरी दोन अशा एकूण ४७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात २२ हजार ७८४ व्यक्तींची अ‍ॅन्टिजेन तपासणी झाली. यापैकी ४२६ पॉझिटिव्ह तर २२ हजार ३५८ निगेटिव्ह आहेत. चंद्रपूर क्षेत्रात जटपूरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ अ‍ॅन्टिजेन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. चाचणी करण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजता अशी ठरविण्यात आली आहे.चंद्रपूर शहरातील रामनगर , गंजवार्ड, रामनगर सिंधी कॉलनी परिसरातील, महेश नगर तुकूम, बाबूपेठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील, जगन्नाथ बाबा नगर, भानापेठ वार्ड, अरविंद नगर, पठाणपुरा वार्ड, मेजर गेट, नगीना बाग, शिवाजीनगर, समाधी वार्ड तर चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस या भागातील बाधित पुढे आले आहेत.मूल शहरातील तर तालुक्यातील चिंचाळा गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी आणि भद्रावती येथील नेताजी नगर परिसरातील एक व्यक्तीकोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या