जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:47+5:30

उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात आलेत. मात्र २४ मार्चला देशात सर्वत्र संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आला.

973 people took shelter in 53 shelters in the district | जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। दररोज दोन वेळचे जेवण, मात्र इतर सुविधांची वाणवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व दुकाने, उद्योग, दळणवळणाची साधने व कामे बंद आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील काही मजूर व नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात अडकले आहेत. त्यांच्या रहिवासासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी २७१५ जणांची क्षमता असलेले ५३ निवारागृहांची व्यवस्था केली आहे. या निवारागृहात सध्या ९७३ जण वास्तव्यास आहेत. दोन वेळच्या जेवण तर येथील लोकांना दिले जाते. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश निवारागृहात इतर सुविधांची वानवा आहे.
उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात आलेत. मात्र २४ मार्चला देशात सर्वत्र संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे मजूर, कामगारवर्ग येथेच अडकून पडला. त्यांच्या राहण्याचा, जेवण्याचा प्रश्न होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी या मजुरांसाठी निवारागृहांची व्यवस्था केली.

सुविधा नसल्याने आश्रयितांमध्ये नाराजी
निवारागृहांमध्ये असलेल्या नागरिकांना पाणी, चहा, सकाळचा नाश्ता, सकाळ-सायंकाळ दोन वेळ जेवण दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश निवारागृहात जेवणाव्यतिरिक्त इतर सुविधा नाही. हाताला काम नाही आणि करमणुकीचेही साधन नाही.

Web Title: 973 people took shelter in 53 shelters in the district