कत्तलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:29+5:30

सावली येथून हैदराबाद येथे आर्वी रोडवर दोन आयचर वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच लाठी येथील उपपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी एमएच ३४ बीजी ८३०८, एमएच ३४ एबी १२०४ या वाहनाला थांबवून वाहनातून ८६ जनावरांची सुटका केली.

86 animals taken for slaughter released | कत्तलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका

ठळक मुद्दे११ जणांना अटक : अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शनिवारी अपर पोलीस अधीक्षकांनी तेलंगणाकडे कत्तलीसाठी नेणाऱ्या ४८ जनावरांची सुटका करुन तीन जणांना अटक केली होती. रविवारी पुन्हा सावली येथून हैदराबाद येथे कत्तीलीसाठी नेणाऱ्या ८६ जनावरांची सुटका करुन ११ जणांना अटक केली. ही कारवाई लाठी येथे केली.
राजू बाबुराव नक्कावार (३२), मारोती गणपत बेडलावार (३१) दोघेही रा. रा. कविठपेट, सत्यनारायण भिमय्या सोतकुल (२५) रा. लक्कडकोट, हफिज खान गुफरान खान (२७), रेहान कय्युम कुरेशी (२८), सोहेल अहमद शेख (१९) तिघेही रा. गडचांदूर, सनाउल्ला खान एहेसान खान पठाण (२९), अलिम युसूफ खान (२९)रा. बल्लारपूर, शेख हमिद शेख मकदुम (२५), ईशाद गफ्फार शेख (१९), जाकिर अहमद शेख (२४) सर्व रा. गोयगाव (तेलंगना) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर इमरान कुरेशी, शहेबाज कुरेशी दोघेही रा. गडचांदूर हे फरार असून शोध सुरु आहे.
सावली येथून हैदराबाद येथे आर्वी रोडवर दोन आयचर वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच लाठी येथील उपपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी एमएच ३४ बीजी ८३०८, एमएच ३४ एबी १२०४ या वाहनाला थांबवून वाहनातून ८६ जनावरांची सुटका केली. तसेच स्कॉटिंगकरिता वापरलेली स्कॉर्पीओ क्रमांक एम एच ३४ एडी ६७६९, टाटा इंडिगो एमएच ४२ एच ०५९२ जप्त करुन एकूण ११ जणांना अटक केली. या कारवाई ४९ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व जनावरे उज्जवल गौरक्षण संस्था येथे पाठविण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या नेतृत्वात उपपोलीस निरीक्षक राठोड, नापोशि गंगाधर, राहुल, वृषभ, संजू, शंकर, स्वप्नील, विशाल तसेच नक्षल विरोधी पथकांनी केली.

 

Web Title: 86 animals taken for slaughter released

टॅग्स :Policeपोलिस