६८७ पाॅझिटिव्ह, १९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:27 IST2021-05-15T04:27:18+5:302021-05-15T04:27:18+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत १ हजार ६७ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात ...

687 positive, 19 dead | ६८७ पाॅझिटिव्ह, १९ जणांचा मृत्यू

६८७ पाॅझिटिव्ह, १९ जणांचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत १ हजार ६७ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर ६८७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. मागील २४ तास १९ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५ हजार ८८५ वर पोहोचली आहे. सध्या १० हजार ८५६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख २९ हजार १६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ४८ हजार ६४१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बाॅक्स

शुक्रवारी झालेले मृत्यू

शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील दत्तनगर येथील ५५ वर्षीय पुरुष, अष्टभुजा वाॅर्ड येथील ५० वर्षीय पुरुष, तुकूम येथील ४६ वर्षीय पुरुष, बाबूपेठ येथील ५३ व ७२ वर्षीय पुरुष, अंचलेश्वर वाॅर्ड येथील ७० वर्षीय पुरुष, ८२ वर्षीय महिला, शांतीनगर येथील ६० वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील जामगाव येथील ६१ वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील आंबेनेरी येथील ६६ वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील ७५ वर्षीय महिला. गडचांदूर येथील ५३ वर्षीय पुरुष. व्याहाड सावली येथील ६० वर्षीय पुरुष. सोनेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ४१ वर्षीय पुरुष. कोरपणा तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बाॅक्स

शुक्रवारचे बाधित

चंद्रपूर पालिका क्षेत्र १८८

चंद्रपूर तालुका २३

बल्लारपूर ८७

भद्रावती ७३

ब्रह्मपुरी २६

नागभिड २०

सिंदेवाही १३

मूल ५९

सावली २७

पोंभुर्णा ०६

गोंडपिपरी ३१

राजुरा २३

चिमूर ०९

वरोरा ३०

कोरपना ५५

इतर १७

Web Title: 687 positive, 19 dead