शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

६७ टक्के बाधित १९ ते ४० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.

ठळक मुद्देसात चिमुकलेही पॉझिटिव्ह : तरुणांनो, सावधान ! घराबाहेर पडू नका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यापूर्वी बाहेर जिल्ह्यातून वा बाहेर राज्यातून आलेले व्यक्ती पॉझिटिव्ह म्हणून पुढे येत होते. मात्र आता संपर्कातूनही अनेक जण बाधित होत आहे. जिल्ह्यातील एकूण ४०५ बाधितांपैकी १९ ते ४० वयोगटातील तब्बल २७२ रुग्ण आहेत. ही टक्केवारी ६७.१६ इतकी असल्याने तरुणांनी आताच अलर्ट होणे गरजेचे झाले आहे.मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.यातील ६७.१६ टक्के म्हणजेच तब्बल २७२ रुग्ण हे १९ ते ४० या वयोगटातील आहेत. यासोबतच ० ते ५ वयोगटातील सात रुग्ण आहेत. ६ ते १८ वयोगटातील २१ रुग्ण, ४१ ते ६० वयोगटातील ९३ रुग्ण आणि ६१ वर्षांवरील १२ रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.बाधितांमध्ये पुरुष सर्वाधिककोरोना विषाणूचा संसर्ग लहान बालके, वयोवृध्दांनाही झाला आहे. पुरुषांसोबत महिलाही या आजाराला बळी पडल्या आहेत. २६ जुलैपर्यंतच्या एकूण बाधितांपैकी ७५ टक्के रुग्ण पुरुष आहेत. एकूण ४०५ रुग्णांपैकी ३०४ रुग्ण हे पुरुष आहेत तर १०१ रुग्ण महिला आहेत.तरुणांनो, बेफिकिरी सोडासध्या चंद्रपूर जिल्ह्यात बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी लॉकडाऊन कायम आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता दिली आहे. मात्र ही शिथिलता बाजापेठेतील कमकुवत झालेली आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येण्यासाठी आहे. नागरिकांना अनावश्यक शहरात, गावात फिरण्यासाठी नाही. असे असले तरी सध्या चंद्रपूर शहरासह सर्व गावांचा विचार केला तर तरुणवर्गच सर्वाधित फिरताना दिसत आहे. आता तर संपर्कातून बाधित होण्याचे प्रकार समोर येत असल्याने तरुणांनी बेफिकिरी सोडून सरकारी नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या