कत्तलखान्यात नेत असलेल्या ६१ जनावरांची मूलमध्ये सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:42+5:302021-07-07T04:34:42+5:30

सावली तालुक्यातून दोन आयशर ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मूल पोलिसांना मिळाली. जनावरांची तस्करी करताना कोणतीही अडचण भासू ...

61 animals taken to slaughterhouse released | कत्तलखान्यात नेत असलेल्या ६१ जनावरांची मूलमध्ये सुटका

कत्तलखान्यात नेत असलेल्या ६१ जनावरांची मूलमध्ये सुटका

सावली तालुक्यातून दोन आयशर ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मूल पोलिसांना मिळाली. जनावरांची तस्करी करताना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी एमएच ०१ बीएफ १५९० क्रमांकाचे चारचाकी वाहन पायलट वाहनाची भूमिका पार पाडत होते. मूल पोलिसांनी फिस्कुटीजवळ नाकाबंदी केली होती. दरम्यान, लाल रंगाची कार समोर येताच तिला थांबविले. वाहनचालक अब्दुल जुबेर अब्दुल रशीद (३२) रा. गडचांदूर यांची चौकशी करीत असताना दोन ट्रक येताना दिसले; परंतु पोलिसांना पाहून चालक अंधाराचा फायदा घेत ट्रक बंद करून पळून गेले. या दोन्ही ट्रकची चौकशी केली असता, जनावरे आढळून आली. एमएच ३४ बीजी १८१३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ गायी व ६ बैल तर एमएच ३४ बीजी ८७१४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ गायी आणि ६ बैल आढळून आले. या जनावरांची किंमत ६ लाख १० हजार रुपये आहे. ट्रकची किंमत २२ लाख तर सुरक्षेसाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रुपये, आरोपीचा मोबाइल १० हजार रुपये, असा एकूण ३३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह कलम ११(१) (ड) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनूज तारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी केली.

Web Title: 61 animals taken to slaughterhouse released