शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

गिट्टीच्या ट्रकमधून ५२० पेट्या दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी घटना असल्याचे बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देसावलीत कारवाई : ७१ लाख रुपयांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली पोलीस स्टेशन अंतर्गत हरांबा-सावली मार्गावर एका गिट्टीच्या ट्रकमध्ये तब्बल ५२० पेट्या दारुची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी घटना असल्याचे बोलल्या जात आहे.सावली परिसरात देशी व विदेशी दारुची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व सावली पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हरांबा, सावली मार्गावर हायवा ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २८३५ ची तपासणी केली असता त्यामध्ये ५०० पेट्या देशी व २० पेट्या विदेशी दारू आढळून आली. सदर ट्रकमध्ये खाली दारूच्या पेट्या आणि वरून गिट्टी ठेवल्याचे पोलिसांना यावेळी आढळले.सदर कारवाईत प्रशांत मल्लेश मेरफुलवार रा. हरंबा, शंकर सावरदास कांबळे रा. गोंदिया, नागराज अल्लूरवार रा. सावली, धमेंद्र सुरेश शर्मा रा. गोंदिया यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आजपर्यंत झालेल्या कारवाईत तालुक्यातील सर्वात मोठी कारवाही असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री सुरु आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील महिलांनी पोलिसांकडे केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी