शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

५०७ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: October 28, 2015 01:17 IST

दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, ....

चंद्रपूर : दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वीत झालेल्या आहेत. मात्र, भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्हाभरातील पाणी स्त्रोतांची तपासणी केली असता, तब्बल ५०७ पाणी नमूने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांवर प्रश्ननिर्माण झाले असून दूषित पाण्यावरच नागरिकांना आपली तहाण भागवावी लागत आहे.गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची असते. अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक हातपंप व विहीरींच्या माध्यमातून नागरिकांची तहान भागत आहे. या पाणी स्त्रोतांची देखभाल व दुरुस्ती संबधीत ग्रामपंचायत, नगर पालिका व मनपा प्रशासनाची आहे. पाणी वाटपात उद्भवत असलेल्या समस्या दूर करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम आहे. मात्र, पाणी पुरवठ्यात येत असलेल्या विविध अडचणींमुळे अनेक गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हगवण, गॅस्ट्रो, साथीचे आजार बळावले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग पाणी पुरवठा योजनांवर संनियंत्रणाचे काम करते. दर महिन्याला पाणी नमूने घेऊन दूषित पाणी आढळल्यास त्यांना उपाययोजना करण्याचे सूचीत केले जाते. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा व शुद्धीकरणासंबधी उपाययोजना करतात. मात्र भूजल सर्व्हेक्षण विभागाने तपासणी केलेल्या १ हजार ३५६ नमुन्यांपैकी ५०७ नमुने दूषित आढळले आहेत. यात क्लोराईडयुक्त अयोग्य असलेले नमुने ११, फ्लोराईडयुक्त आढळले.