रामाळा तलाव परिसरातील फूट ओव्हर पुलासाठी ४.९६ कोटी मंजूर

By Admin | Updated: March 29, 2016 02:24 IST2016-03-29T02:24:50+5:302016-03-29T02:24:50+5:30

चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून फूट ओव्हर पुलासाठी ४ कोटी ९६ लाख ९४ हजार

4.96 crore sanctioned for foot over bridge in Ramala lake area | रामाळा तलाव परिसरातील फूट ओव्हर पुलासाठी ४.९६ कोटी मंजूर

रामाळा तलाव परिसरातील फूट ओव्हर पुलासाठी ४.९६ कोटी मंजूर

चंद्रपूर : चंद्रपुरातील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून फूट ओव्हर पुलासाठी ४ कोटी ९६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरातील या रामाळा तलावाच्या फुट ओव्हर पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव सन २०१३-१४ मध्ये आणि २०१४-१५ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला होता. या फूट ओव्हर पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ९६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी एक कोटी ८२ लक्ष २१ हजार रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
रामाळा तलाव हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून येथील सौंदर्यीकरणासाठी ना. मुनगंटीवार प्रयत्नशील आहे. या फूट ओव्हर पुलाच्या बांधकामामुळे पर्यटक व नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांसाठी निधी दिला आहे. त्या निधीतून विकास कामे केली जात असून विकासाला चालना मिळाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 4.96 crore sanctioned for foot over bridge in Ramala lake area