शिबिरात ४१ युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST2021-05-29T04:22:23+5:302021-05-29T04:22:23+5:30

फोटो चिमूर : कोविड १९ महामारी संकट काळात कोरोना रूग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तसाठा असणे आवश्यक आहे. तेव्हा केंद्रीय ...

41 youths donated blood in the camp | शिबिरात ४१ युवकांनी केले रक्तदान

शिबिरात ४१ युवकांनी केले रक्तदान

फोटो

चिमूर : कोविड १९ महामारी संकट काळात कोरोना रूग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तसाठा असणे आवश्यक आहे. तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बंटी भांगडिया यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ४१ युवकांनी रक्तदान केले.

भाजप तालुका चिमूरच्यावतीने अभ्यंकर मैदानातील सभागृहात या शिबिराचे आयोजन झाले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकर,भाजपचे जिल्हा सचिव राजू देवतळे, तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, युवा नेते समीर राचलवार, अशोक कामडी, बंटी वनकर, कुणाल कावरे, शिबिराचे संयोजक श्रेयस लाखे, संजय कुंभारे, विकी कोरेकर, जयंत गौरकर, अमित जुमडे, अरुण लोहकरे, रमेश कंचर्लावार, छाया कंचर्लावार, आशु झिरे, धीरज सातपैसे आदी उपस्थित होते.

===Photopath===

280521\1654-img-20210528-wa0038.jpg

===Caption===

चिमूर येथील रक्तदान शिबिरात रक्तदान करताना

Web Title: 41 youths donated blood in the camp