शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

396 जि.प. कर्मचाऱ्यांच्या अखेर समुपदेशनातून बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पंचायत, वित्त, कृषी, शिक्षण विभागातील पात्र कर्मचारी बदली प्रक्रियेला सामोरे गेले. सोमवारी बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व महिला कल्याण तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि मंगळवारी आरोग्य, सिंचन व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाली. 

ठळक मुद्दे१०१ विनंती बदल्या मंजूर : ६६ कर्मचारी नक्षलग्रस्त भागात

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार २५ ते २७ जुलै २०२१ दरम्यान चाललेल्या समुपदेशन प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील ३९६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या मंजूर झाल्या आहेत. ६६ कर्मचाऱ्यांना बिगर नक्षलग्रस्त भागातून नक्षलग्रस्त भागात बदली करण्यात आली आहे.शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पंचायत, वित्त, कृषी, शिक्षण विभागातील पात्र कर्मचारी बदली प्रक्रियेला सामोरे गेले. सोमवारी बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व महिला कल्याण तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि मंगळवारी आरोग्य, सिंचन व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाली. बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रमाणपत्रासह जि. प. च्या कन्नमवार सभागृहात दाखल झाले होते. 

असा आहे बदलीचा संवर्गजि. प. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १०१ जणांच्या विनंती, ६६ बिगर नक्षलग्रस्त भागातून नक्षलग्रस्त भागात आणि सहा पंचायत समित्यांमध्ये बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रात समतोल साधण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अशा एकूण ३९८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा तिढा सुटलागतवर्षीच बदली झालेल्या चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) भारमुक्त केले नव्हते. तेव्हापासून हे अधिकारी तेथेच कार्यरत होते. सेवा ज्येष्ठता शून्य दाखविल्याने नवीन बदली प्रक्रिया दरम्यान त्यांची नाराजी होती. अखेर प्रशासनाने यावर नियमानुसार मार्ग काढून चारही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बदली केली आहे.  

जि. प. संवर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शी होती. बदली संदर्भात कुणाच्याही तक्रारी नाहीत. समुपदेशनाद्वारे पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. - श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली