२४ तासात ३९रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:05+5:302021-01-10T04:21:05+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, ...

39 patients coronary free in 24 hours | २४ तासात ३९रुग्ण कोरोनामुक्त

२४ तासात ३९रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या ४८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १२, चंद्रपूर तालुक्यात ६, भद्रावती ४, सिंदेवाही २, मूल ३, राजूरा २, चिमूर १३, वरोरा ४ व इतर ठिकाणचे २ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 39 patients coronary free in 24 hours