शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

३०२ कोरोनामुक्त तर १९७ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०५ बाधिताचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकूण बाधित १४५८४ । उपचार घेत असलेले बाधित २९२८

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी ३०२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १९७ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १९७ बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १४ हजार ५८४ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ११ हजार ४३९ झाली आहे. सध्या दोन हजार ९२८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १४ हजार ६३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९८ हजार ५५६ नमुने निगेटिव्ह आले आहे. चंद्रपूर शहरातील व परिसरातील भानापेठ वार्ड, रयतवारी कॉलरी, मार्डा, सुभाष नगर, दुर्गापूर, स्नेहनगर, जुनोना चौक परिसर, भिवापूर वॉर्ड, लखमापूर, जलनगर, बालाजी वार्ड, वडगाव, राष्ट्रवादी नगर, हनुमान नगर, तीर्थरूप नगर, तुकूम, सरकार नगर, गौतम नगर, माता नगर, इंदिरानगर, बापट नगर, बालाजी वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.बल्लारपूर तालुक्यातील बामणी, दूधोली, कोठारी भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, बावणे लेआउट परिसर, हनुमान वार्ड, सोईट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, शेष नगर, देलनवाडी, बोरगाव, कुरझा, नवेगाव, मेढकी, हलदा परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील सुरक्षा नगर, आंबेडकर वार्ड, नवीन सुमठाना, गुरु नगर, भंगाराम वार्ड, डिफेन्स चांदा परिसर,सागरा,माजरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चौगान, शिवाजी वार्ड, रामनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी, नवेगाव, लोनखैरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, कन्हाळगाव, गोवर्धन चौक परिसर, नवखळा, वलणी, बाळापूर, पुलगाव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.तालुकानिहाय नवे बाधितजिल्ह्यात शनिवारी पुढे आलेल्या १९७ बाधितांमध्ये १०८ पुरुष व ८९ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ६७, पोंभुर्णा तालुक्यातील ११, बल्लारपूर तालुक्यातील सहा, मुल तालुक्यातील ३५, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील ११, नागभीड तालुक्यातील १६, वरोरा तालुक्यातील १३, भद्रावती तालुक्यातील ११, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली सात तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण १९७ बाधित पुढे आले आहेआणखी चार जणांचा मृत्यूशनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०५ बाधिताचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या