शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील रस्त्यांसाठी २ कोटी ३५ लाखांचा निधी

By admin | Updated: March 12, 2016 01:20 IST

नगर परिषदेच्या इतिहासात कधी नव्हे एवढा निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने व माजी आ. अतुल देशकर,...

ब्रह्मपुरी : नगर परिषदेच्या इतिहासात कधी नव्हे एवढा निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने व माजी आ. अतुल देशकर, नगराध्यक्ष रीता उराडे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला आहे. रस्ते विकास निधी अंतर्गत विशेष अनुदान म्हणून २ कोटी ३५ लाख मंजूर झाले असून या निधीतून ब्रह्मपुरी शहरातील रस्त्यांची सुधारणा व नवीन रस्ते बांधकाम होणार आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेवर ब्रह्मपुरीकरांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, आजपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्न झाले नाही. नगर परिषदेत सत्ता भाजप आली व राज्यातही भाजपची सत्ता असल्याने माजी आ. अतुल देशकर व नगराध्यक्ष रिता उराडे यांनी रस्ते कामासाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे दोन कोटी ३५ लाखाचा विशेष निधी रस्त्यांसाठी मंजूर झाला आहे. इतर नगर पालिकांपेक्षा ब्रह्मपुरी पालिकेला भरीव निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने शहरवासींयात आनंद पसरला आहे. या निधीअंतर्गत जो भाग मागासलेला आहे, अशा भागात रस्त्यांचा विकास करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा प्रयत्न होणार आहे. निधी मिळाल्याबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक उराडे, शहर प्रमुख जगदिश तलमले, मनोज वठे, मनोज भूपाल, हेमलता नंदूरकर, विक्रम कावळे, संजय बावनकुळे, प्रशांत ताम्हण आदीने आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)