१८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:36+5:30

आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दोनशेवर जोडप्यांचा विवाह या संस्थेने लावून दिला आहे.

18 handicapped couple married | १८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात

१८ दिव्यांग जोडपी अडकली साताजन्माच्या बंधनात

Next
ठळक मुद्देमंगलाष्टकाच्या साक्षीने विवाहबद्ध : राज्यभरातील जोडपी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रितीरिवाजाने झालेला हळदीचा कार्यक्रम, सांस्कृतिक मेजवानी आणि रविवारी महाकाली मंदिर येथून वाजतगाजत निघालेली वरात, लग्नमंडपात वºहाडयांची गर्दी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर, सनईचे सूर आणि मंगलाष्टकाच्या साक्षीने तब्बल १८ दिव्यांग जोडपी साताजन्माच्या गाठीत बांधले गेले.
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. गौरवबाबू पुगलिया संगणकीकृत उपवर-वधु सूचक केंद्र चंद्रपूरच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेले १८ दिव्यांग जोडपे विवाहबद्ध झाले. दिव्यांगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून आजतागायत दोनशेवर जोडप्यांचा विवाह या संस्थेने लावून दिला आहे. रविवारी आयोजित विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोेले, आमदार प्रतिभा धानोरकर, राहुल पुगलिया, श्याम पुगलिया, संजय देरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिंदे, अशोक ओस्तवाल, अनिल लुनिया, कीर्तिकुमार कटरे, जेसा मोटवानी, गजानन गावंडे, प्रशांत दानव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात १८ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी विवाहित नवदाम्पत्याना भेटवस्तू देण्यात आली. तर काही गरजू दिव्यांगांना शिलाई मशिन भेटरुपात देण्यात आली. जगप्रसिद्ध कला शिक्षक, प्रल्हाद ठक, अमित टिपले, गुरुदास राऊत, मृगेश गजबे, मनोज आणि वृशाल ब्राह्मणकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
विवाह सोहळ्यासाठी श्याम पुगलिया, अरुण पुगलिया यांच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला होता. तर अशोक कोठारी, दिनेश चोरडिया, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा, रतन गांधी, प्रकाश शहा, देवेंद्रभाई शहा, शैलेंद्र बैद, प्रवीण गोठी, राजेश जैन, अनुप खटोड, रेणू जैन यांनी सहकार्य केले. यावेळी आस्थाचे संजय पेचे, आशिष आक्केवार, महेश भगत, विनोद भोयर, यशवंत देशमाने, रोहित पुगलिया, विवेक पाटील, अमोल मारोतकर, प्रकाश राजूरकर, अविनाश गायधने आदींनी सहकार्य केले.

प्रत्येकवेळी आस्थाच्या पाठिशी : पुगलिया
दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, म्हणून आपण सदैव आस्थाच्या पाठिशी उभे राहू. दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याची व्याप्ती वाढत असेल तर नक्कीच वाढू द्या. पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक दिव्यांग जोडप्यांचा विवाह लावून देण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.

Web Title: 18 handicapped couple married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न