१८ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:18+5:302021-02-05T07:40:18+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ४९ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ...

18 corona positive, both die | १८ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

१८ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ४९ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५२३ झाली आहे. सध्या १३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ९९ हजार १४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ७३ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील अजयपूर येथील ७६ वर्षीय पुरुष व भद्रावती शहरातील ७४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९१ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नऊ, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोना आजार अद्याप गेला नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 18 corona positive, both die