शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेतील १६६ कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता.

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) सभेत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यानुसार २४८ कोटींना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्त विभागाने तब्बल १६६ कोटींना कात्री लावून फक्त ८२ कोटींचा निधी मंजूर केला. नियोजन समितीच्या निधीतून ६७ टक्क्यांची कपात केल्याने जिल्ह्याच्या विकासावर मोठा अनिष्ट परिणाम होणार आहे.जिल्हा वार्षिक आराखडा आणि विशेष कृती आराखडा नियोजन दरवर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून तयार केला जातो. या समितीकडून विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्हा नियोजन समितीने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४८ कोटींच्या आराखड्याला चार महिन्यांपूर्वीच मंजूर केला होता. त्यामध्ये कृषी संलग्न सेवा, ग्रामीण विकास, ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे पाठविलेल्या आराखड्याला मंजुरीही मिळाली होती. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वित्त विभागाने ४ जून २०२० रोजी शासन निर्णय जारी करून ३३ टक्के निधीलाच मंजुरी देऊन ६७ टक्के निधीला कात्री लागली. त्यानुसार आता जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन विकास समितीला सर्वसामान्य योजनेअंतर्गत केवळ ८२ कोटींचा निधी मिळणार आहे.विकासासाठी केवळ ८ टक्के निधीजिल्हा वार्षिक योजना आराखडा, समाजकल्याण व आदिवासी उपयोजनेसाठी केवळ ३३ टक्के निधी मंजूर करताना खर्चासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिले आहेत. त्यानुसार प्राप्त होणाऱ्या एकून निधीच्या ३३ टक्के निधीतून २५ टक्के कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या केवळ ८ टक्के निधीतून जिल्ह्यातील विकासाची कामे कशी होणार, हा प्रश्नच आहे.आदिवासी विकास व समाज कल्याण निधीतही कपातसमाज कल्याण व आदिवासी उपयोजनेच्या निधीतही ६८ टक्के कपात करण्यात आली आहे. या दोन्ही विभागाकडून राज्य शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव सुमारे १०० कोटींचा होता. यंदा अत्यल्प निधी मिळाल्याने आर्थिकदृष्टी गरीबांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना बंद राहणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद