प्रवासी ऑटोतून देशी दारूच्या १६ पेट्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:06+5:302021-02-05T07:35:06+5:30

घुग्घुस : प्रवासी ऑटोमधून दारू तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर-घुग्घुस रस्त्यावरील नागाळानजीक ...

16 boxes of liquor seized from passenger car | प्रवासी ऑटोतून देशी दारूच्या १६ पेट्या जप्त

प्रवासी ऑटोतून देशी दारूच्या १६ पेट्या जप्त

घुग्घुस : प्रवासी ऑटोमधून दारू तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपूर-घुग्घुस रस्त्यावरील नागाळानजीक सापळा रचून प्रवासी ऑटोला अडवून झडती घेतली असता १६ पेट्या दारू आढळून आली.

शनिवारी दुपारी गुप्त माहितीनुसार नागाळानजीक स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. दरम्यान संशयास्पद स्थितीत येणाऱ्या प्रवासी ऑटो क्र. एमएच ३४ बी ७२३३ ला थांबवून तपासणी केली. त्यात एक लाख ६० रुपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी दोन लाखाच्या वाहनासह तीन लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी ऑटोचालक आरोपी मनिधन स्वामी वेलय्याधन स्वामी (५५) रामनगर, चंद्रपूर याला अटक करून घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: 16 boxes of liquor seized from passenger car