शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटींचा भेंडाळा प्रकल्प १० वर्षापासून धूळखात

By admin | Updated: December 23, 2016 00:49 IST

तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे.

पत्रकार परिषद : प्रकल्प पूर्ण करण्याची अविनाश जाधव यांची मागणी राजुरा : तालुक्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागातील भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्प अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मागील १० वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प १४ कोटी रुपयांचा असून त्याला पुनर्जीवित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. या प्रकल्पाची किंमत एक हजार ४५२ लाख असून प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी २०१९ पर्यंत आहे. प्रकल्पाील लाभक्षेत्र तीन हजार ९१५२ हेक्टर असून संपादित क्षेत्र ६२८ हेक्टर आहे. बेरडी या गावाचे पूर्नवसन न झाल्यामुळे हा प्रकल्प होण्यास विलंब होत असून प्रकल्पाची किंमत वाढत चालली आहे. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील भेंडाळा, विरूर स्टेशन, खांबाळा, सिंधी, नलफडी, मुर्ती, विहिरगाव, कोलामगुडा येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. भेंडाळा प्रकल्पाचे काम ४० वर्षापासून सुरू असून चुकीच्या कालव्याच्या नियोजनामुळे शासनाचे करोडो रुपये वाया जात आहे. राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी व वरदान ठरणाऱ्या या सिंचन प्रकल्पाला पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)