शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

११७ प्रकरणातून १८ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:06 IST

विना परवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून येथील तहसील

नागभीड तहसील कार्यालयाची कारवाई : गौण खनिजाची अवैध वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : विना परवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून येथील तहसील कार्यालयाने गेल्या वर्षभरात १७ लाख ८४ हजार ८४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.वैनगंगा नदी ब्रह्मपुरी तालुक्याच्या सीमेवर असली तरी या नदीतून काढण्यात येणाऱ्या रेतीची नागभीड तालुक्यातूनच वाहतूक करण्यात येते. ब्रह्मपुरी-नागभीड राष्ट्रीय महामार्ग आणि पाहार्णी-बाम्हणी राज्य महामार्ग हे दोन प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांनी रेतीची वाहतूक करताना वाहतुकदार कधी ती विनापरवाना करीत असतात तर कधी वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त करीत असतात. त्याचबरोबर या तालुक्यातून मुरूम आणि गिट्टीची सुद्धा वाहतूक होत असते. गिट्टी आणि मुरूमही रेतीप्रमाणेच विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्यात येत असते.या विनापरवाना आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या नागभीड तहसील कार्यालयाने १ आॅगस्ट २०१६ ते जुलै १७ या कालावधीत ११७ वाहनांवर कारवाई केली. या वाहनांवर कारवाई करण्यात आल्यानंतर १७ लाख ८४ हजार ८४० रुपये दंड आकारण्यात आला. या वाहनात ट्रक, ट्रॅक्टर आणि हायवा आदी वाहने आहेत. वाहनांवर कारवाई करण्यात आल्यानंतर ही सर्व वाहने येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली व दंड वसूल केल्यानंतर सोडण्यात आली.रस्त्यांची अवस्था दयनीयरेतीची ही वाहतूक वर्षभर होत असल्याने त्यातही रोजच शेकडो ट्रकने ही वाहतूक होते. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. पाहार्णी-काटेगाव - बाम्हणी रस्त्याची अवस्था पाहण्यासारखी आहे. स्थानिक नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तर ब्रह्मपुरी-नागभीड-कानपा हा राष्ट्रीय महामार्गही प्रभावित होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने पाळत ठेवावी.