शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

११ जिल्हा परिषद सदस्यांची निर्दोष सुटका

By admin | Updated: January 15, 2016 01:40 IST

सन २०१० मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

कुलूप ठोकल्याचे प्रकरण : तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा समावेशचंद्रपूर : सन २०१० मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी तत्कालीन जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ११ जणांविरूद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा खटला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता. गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत अकराही जिल्हा परिषद सदस्यांची निर्दोष मुक्तता केली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सभांना व कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या कारणावरून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूकर, उपाध्यक्ष संदिप करपे, सभापती विनोद अहिरकर, सभापती आसावरी देवतळे, सभापती प्रफुल खापर्डे व जि.प. सदस्य पंजाबराव गावंडे, सुधाकरराव कुंदोजवार, विलास डांगे, कन्हैय्यालाल जयस्वाल, संदिप गड्डमवार, तुळशिराम श्रीरामे यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन केले. या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी अकराही जिल्हा परिषद सदस्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून अटक केली. त्यानंतर सर्व सदस्यांची जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. गेल्या पाच वर्षांपासून हा खटला सुरू होता. गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने प्रकरणाचा निकाल देत अकराही जिल्हा परिषद सदस्य निर्दोष असल्याचा निकाल दिला. (स्थानिक प्रतिनिधी)