युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:34+5:302021-04-25T04:34:34+5:30

संतोष जाधव हा बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. तहान लागली म्हणून एका काठोकाठ पाण्याने भरलेल्या विहिरीवर गेला होता. ...

Youth drowns in well | युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू !

युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू !

संतोष जाधव हा बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. तहान लागली म्हणून एका काठोकाठ पाण्याने भरलेल्या विहिरीवर गेला होता. विहिरीतून पाण्याची बॉटल भरून घेत असताना अचानक पाय घसरला आणि तोल जाऊन तो विहिरीत पडला़ पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, संतोष जाधव सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत न आल्याने शोध घेतला असता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या घटनेची माहिती गावचे पोलीसपाटील यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली असता ठाणेदार राजवंत आठवले यांच्या सूचनेवरून बिट अंमलदार पंजाबराव साखरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे़ संतोषच्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला असून त्याच्या पश्चात आई व चार बहिणी आहेत. त्याच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने भरोसा गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Youth drowns in well