अपघातात युवकाचा मृत्यू; एक जखमी

By Admin | Updated: January 1, 2015 00:43 IST2015-01-01T00:43:11+5:302015-01-01T00:43:11+5:30

बुलडाणा तालुक्यातील रोईखेड मायंबा येथे अपघात.

Youth dies in accident; One injured | अपघातात युवकाचा मृत्यू; एक जखमी

अपघातात युवकाचा मृत्यू; एक जखमी

बुलडाणा : धाड येथून रोईखेड मायंबा गावाकडे पायी जाणार्‍या एका युवकाला मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीस्वार युवकही खाली पडून गंभीर जखमी झाला. औरंगाबाद येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३0 डिसेंबर रोजी रात्री १0 वाजता घडली.
बुलडाणा तालुक्यातील रोईखेड मायंबा येथील अंकुश पुंडलिक शेळके (३0) हा काही कामानिमित्त दुचाकीने धाड येथे आला होता. रात्री गावाकडे परत जात असताना सावळी गावानजीक दोन-तीन युवक रस्त्याने जात होते. यावेळी अंकुश शेळके याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच्या दुचाकीने रस्त्यावरील एका युवकाला जोरदार धडक दिली. यामुळे अंकुश शेळकेसह रस्त्यावरील युवक जखमी झाला. दोन्ही युवकांना बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अंकुशची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान रात्री अंकुशचा येथे मृत्यू झाला.

Web Title: Youth dies in accident; One injured