जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बांधारा चुकीच्या ठिकाणी

By Admin | Updated: March 17, 2017 13:35 IST2017-03-17T13:35:13+5:302017-03-17T13:35:13+5:30

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बाधांच्या कामाचा ‘ले आऊट’ तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे  पाणी साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे.

In the wrong place to construct cement under Jalakit Shivar Yojana | जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बांधारा चुकीच्या ठिकाणी

जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बांधारा चुकीच्या ठिकाणी

 

 

लघुसिंचन विभागाचा प्रताप
धामणगांव बढे: जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बाधांच्या कामाचा ह्यले
आऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे  पाणी
साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे.
शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत
कोट्यवधी रुपये खर्च करित आहे. या योजनेंतर्गत भाग नं.२ मध्ये शेषराव
शामराव बढे यांचे गट नं.४७३ या शेतानजिक ह्यले आऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीचा
टाकण्यात आला. यावेळी संबंधित शेतकऱ्यास विश्वासात घेण्यात आले नाही.
चुकीच्या ह्यले आऊटह्ण मुळे पाण्याचा प्रवाहदेखील बदलणार आहे. या सिमेंट
बंधाऱ्याचे काम मोठ्या प्रमाणात पुर्ण झाले आहे. बांधकाम झाल्यानंतर
संबंधित शेतकऱ्यांचा ही बाब लक्षात आली. त्यामुळे लघुसिंचन विभागाच्या
कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चुकीच्या ह्यले आऊटह्ण मुळे दोन्ही
बाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे लघुसिंचन विभाग आपल्या
कामाबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते.

पाणी मुरेल की पैसा ?
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धा.बढे येथील नदीवर कोट्यवधीची कामे सुरु आहे.
मात्र ही कामे नियमानुसार होत नाही. नफ्यामध्ये सरळ भागीदारी काहींना
देण्यात येत असल्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ह्यपाणी मुरेल की पैसाह्ण
हा प्रश्न जनतेस पडला आहे.



या ठिकाणी टाकलेला ह्यले आऊटह्ण तांत्रिकदृष्टया चुकीचा आहे. ही बाब संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी देखील हे मान्य
केले. परंतु संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानास जबाबदार हा खरा प्रश्न आहे.
- संजय बढे
काँग्रेस कार्यकर्ता, धा.बढे.

Web Title: In the wrong place to construct cement under Jalakit Shivar Yojana