विहिरीत पडल्याने महिला गंभीर

By Admin | Updated: March 20, 2017 02:11 IST2017-03-20T02:11:27+5:302017-03-20T02:11:27+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील घटना.

Women's critical due to fall in well | विहिरीत पडल्याने महिला गंभीर

विहिरीत पडल्याने महिला गंभीर

सिंदखेडराजा, दि. १९- तालुक्यातील सोनोशी येथे पाणी टंचाई असल्याने गावापासून दूरच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला त्या विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सोनोशी येथे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील विविध व्यक्तींनी हा प्रश्न हाती घेतला असून, निवेदने देत आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे. त्यातच १९ मार्चला सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास गावातील मथुराबाई सौंदाजी सानप ही महिला गावापासून एक किलोमीटर अंतरावरील महादेव मंदिरानजीकच्या नीलेश जाधव यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिची मुलगी निकिता सोबत होती. विहिरीतून पाणी काढत असताना बादलीचे ओझे जास्त झाल्याने मथुराबाईचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. त्यावेळी निकिताने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी विहिरीत बाज टाकून मथुराबाईला बाहेर काढले.

Web Title: Women's critical due to fall in well