विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 6, 2015 01:44 IST2015-03-06T01:44:05+5:302015-03-06T01:44:05+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील घटना.

Woman's death by electric shocks | विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

जानेफळ (जि. बुलडाणा) : घरकाम करीत असताना विद्युत धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता जानेफळ येथे घडली. येथील निर्मला अनंत महाले (३५) या महिलेचा घरकाम करीत असताना विद्युत प्रवाह असलेल्या एका लोखंडी ताराला धक्का लागला. त्यामध्ये निर्मला महाले या महिलेला जोरदार विद्युत शॉक लागला. यातच या महिलेचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर पोलीस तपास सुरू होता.

Web Title: Woman's death by electric shocks