शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांमध्ये अभद्र युती संपतील काय?

By admin | Updated: May 26, 2014 00:24 IST

आगामी नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना भाजपा यांची अभद्र युती तुटणार का?

राजेश शेगोकार/ बुलडाणा

लोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अभद्र युतीचा मुद्दा काँग्रेस-राष्टवादीच्या राज्यस्तरावरील सुकाणू बैठकांपर्यत गाजला. लोकसभेत एकमेकांच्या गळयात गळा घालुन मतांच्या माळा जमा करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालीकांमध्ये मात्र सेना भाजपा सोबत गळयात गळा घालतात. या निवडणुकीत सेना-भाजपानेच काँग्रेस राष्ट्रवादी संपविली असुन आता येणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत अभद्र युती तुटणार का? याकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे. बुलडाणा, खामगाव, जळगाव जामोद या तीन नगरपालीकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने सेना भाजपाला हाताशी घेतले आहे. विशेष म्हणजे या नगरपालीकांचा समावेश असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकमेकांविरोधात लढलेले व पुढे लढणारे पक्षच सोबत बसले आहेत. विधानसभा निवडणुका पाहता आता महिनाभरावर येऊन ठेपलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांद्वारे अभद्र युती तोडून राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील युती, आघाडीचा मार्ग धरण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे पालीकांमधील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत.