लग्नाचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार

By Admin | Updated: June 16, 2014 00:52 IST2014-06-15T23:28:49+5:302014-06-16T00:52:36+5:30

लग्नाचे आमिष दाखवून सख्या चुलत दिराने वहिनीचे चार महिने सतत लैंगिक शोषण

Wife raped by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून वहिनीवर बलात्कार

शेगाव: लग्नाचे आमिष दाखवून सख्या चुलत दिराने वहिनीचे चार महिने सतत लैंगिक शोषण केले. त्यानंतर तो मी नव्हेच ची भुमिका घेवून लग्नास नकार देणार्‍या दिराविरूध्द गौलखेड येथील एका पिडीत महिलेने शेगाव ग्रामीण पोलीसात १३ जून रोजी तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील गौलखेड येथील एका युवकाचे गत ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्या विवाहितेचे चुलत दिर महेंद्र ज्ञानदेव बोदडे वय २२ याच्याशी सुत जुळले. प्रेमाच्या आणाभाका झाल्यानंतर दोघांनीही ७ एप्रिल रोजी सुरत येथे पळ काढला होता. याबाबतची माहिती नातेवाईकांना समजल्यावरून नातेवाईकांनी दोघांनाही घरी आणले होते. मात्र विवाहितेच्या पतीने तिला घरात घेण्यास नकार दिला होता. तेव्हापासून सदर महिला माहेरी मुक्कामी होती. त्यानंतर दिराने लग्नास नकार दिला. त्यामुळे सदर महिलेने शेगाव ग्रामीण पोलीसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीसांनी भादंवि ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास पीएसआय दुतोंडे करीत आहेत.

Web Title: Wife raped by showing lover of marriage