शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरण्या उलटण्याच्या वाटेवर

By admin | Updated: July 22, 2014 00:15 IST

अत्यल्प प्रमाणात पाऊस असून, साखरखेर्डा परिसरात तर अद्यापर्यंत कोठेही दमदार पावसाने हजेरी लावली नाही.

सिंदखेडराजा : तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस असून, साखरखेर्डा परिसरात तर अद्यापर्यंत कोठेही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. केवळ रिमझिम पावसाच्या भरवशावर ७५ टक्के शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे आता दुबार पेरणीही उलटण्याच्या वाटेवरच दिसून येत आहे.
सिंदखेडराजा तालुका हा मराठवाड्याशी संलग्न आहे. जी गावे मराठवाडा सीमेवर आहेत, त्या भागात पेरणीपुरता पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी पेरण्या जून महिन्यातच केल्या; परंतु सारखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन या महसूल मंडळात पाऊसच पडला नाही. पावसाची सरासरी टक्केवारी पाहिली, तर ५ टक्केही पाऊस पडला नाही. शेंदुर्जन या मंडळात २ महिन्यात फक्त २५.00 मिमी पाऊस पडल्याने एकाही शेतकर्‍याने पेरणी केली नाही. तालुक्यातील मोहाडी, राताळी, शिंदी, सवडद, साखरखेर्डा, गुंजमाथा, सावंगीभगत, तांदूळवाडी, गोरेगाव, उमनगाव, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, पांग्रीकाटे, शेंदुर्जन, राजेगाव, हनवतखेड, हिवरागडलिंग, वाघाळा, शिवणी देशमुख, मलकापूर पांग्रा, आंबेवाडी, आगेफळ, झोटिंगा, देऊळगाव कोळ ही गावे पावसाविनाच आहे. दररोज ढगाळ वातावरण, २ मिनिटाचा रिमझिम पाऊस यामुळे शेतकरी पेरणीची लगबग करतो. शेतात पेरणीला सुरुवात करताच उन्हाचे चटके सुरू होतात. दररोजचा हा ऊन-सावलीचा खेळ पाहून शेतकरी पुरता धास्तावलेला आहे. महागडे सोयाबीन बियाणे, रासायनिक खते व पेरणीचा इतर खर्च याचा संपूर्ण हिशोब केला, तर एकरी १0 हजार रुपये खर्च शेतकर्‍यांना झालेला आहे. काहींची पहिली पेरणी वाया गेली असून, त्यांनी दुबार पेरणी केली आहे. किमान १ हजार हेक्टरवरील कपाशीवर उगवण्याअगोदरच वखर फिरविण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. कपाशी येत नाही म्हणून सोयाबीनशिवाय पर्याय नाही. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनही लांबणीवर पडत आहे. मागील वर्षी सर्वाधिक पाऊस तालुक्यातील शेंदुर्जन येथे बरसला होता. यावर्षी मात्र सर्वात कमी शेंदुर्जन येथेच झाला आहे. सतत गारपिटीमुळे अगोदर हरभरा, कांदा, गहू गेला. सोयाबीन आणि कापसाचे नगदी पीक हेही पाऊस नसल्यामुळे पेरता आले नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.