शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे दस्तऐवज गहाळ

By admin | Updated: May 24, 2014 00:08 IST

लोणार तालुक्यातील सोनाळा येथील पाणीपुरवठा योजनेचे दस्ताऐवज २00७ पासून गहाळ!

लोणार : तालुक्यातील सोनाळा येथील भारत निर्माण अंतर्गत राबविण्यात येणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे दस्ताऐवज २00७ पासून गहाळ झाले आहेत. त्यामुळे कामे पूर्ण न करताच येथे बिले काढण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला नियमीत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता भारत निर्माणच्या माध्यमातून शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रुपयाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन दिला. मात्र ग्राम पातळीवर पाणीपुरवठा योजनेची कामे न करताच संबंधित अधिकार्‍यांनी ह्या योजना भ्रष्टाचाराच्या चिखलात लोटल्या सोनुना याठिकाणी २00७ पासून भारत निर्माण अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. योजनेचे अर्धवट काम करुन ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता डि.के.पागोरे यांनी गावातील समिती, ग्रामपंचायत सचिव, तलाठी यांना हाताशी धरुन योजनेचे काम न करता पूर्ण बिल काढून घेतले. योजनेचे काम पूर्ण न झाल्याने गावकर्‍यांना नियमीत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतल्या गेली नाही. श्रीराम गोविंद हाके यांनी सदर योजनेच्या दस्ताऐवजाची मागणी माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायत, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयाकडे केली. मात्र सर्वांनी मिळून केलेल्या अफरातफरीमुळे या अधिकार्‍यांनी योजनेचे संपूर्ण दस्ताऐवजच गहाळ करुन टाकल्याचे समजते. गावातील भारत निर्माण योजनेच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र या समिती सदस्यांनाही कार्यकारी अभियंता पागोरे यांनी लोणारवरुनच परत पाठवून दिल्याचा आरोपही हाके यांनी केला. तसेच योजनेचे खोटे दस्ताऐवज तयार करुन ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर सादर करुन त्यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडे पडणार आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करुन दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी हाके यांनी केली आहे.