शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी १७ पोलीस ठाण्यांची ‘डायरी’ कोरी

By admin | Updated: January 2, 2015 00:51 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशी १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

बुलडाणा: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा रात्री उशिरा राउंडअप घेतला असता, १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नसल्याचे दिसून आहे. उरलेल्या १0 पोलीस ठाण्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात गुन्हे नोंदविले गेले असून, महिलेच्या विनयभंगा पासून तर चोरी, मारहाण व अपघाताच्या घटना घडल्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये डायरी अतिशय महत्त्वाची असते. परिसरात घडणार्‍या प्रत्येक गुन्ह्याची नोंद सदर डायरीत नोंदविली जात असल्याने ही डायरी म्हणजे त्या परिसरातील गुन्हेगारीचे स्वरूप अन् सामाजीक स्वास्थ दर्शविणारे दिशादर्शक असते. सन २0१४ मध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले होते. चोर्‍या व महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झालेली होती. त्यामुळे सन २0१५ मध्ये गुन्ह्याचे प्रमाण घटले पाहिजे ही सर्वांंचीच अपेक्षा आहे.

*गुन्ह्यांची नोंद नसलेली ठाणी

नववर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा जिल्ह्यातील, बुलडाणा ग्रामीण, डोणगाव, धामणगाव बढे, अंढेरा, हिवरखेड, पिंपळगाव राजा, जलंब , मलकापूर ग्रामीण, लोणार, किनगाव राजा, जानेफळ, साखरखेर्डा, डोणगाव, सिंदखेडराजा, तामगाव पोलीस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.