अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार

By Admin | Updated: October 8, 2016 01:46 IST2016-10-08T01:46:56+5:302016-10-08T01:46:56+5:30

सुलतानपूरवरून मेहकरकडे जाणा-या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिली धडक.

Unknown vehicle hit bicycle; One killed | अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार

सुलतानपूर (जि. बुलडाणा), दि. ८- सुलतानपूरवरून मेहकरकडे जाणार्‍या एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता मेहकर-सुलतानपूर रोडवर घडली.
प्रवीण नामदेव आवारे (वय २५) वर्ष रा.हिवरा खुर्द ता.मेहकर हा युवक मोटारसायकल क्रमांक एमएच २८ ए.ई.३७४४ ने मेहकरकडे जात होता. दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रवीण आवारे याचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unknown vehicle hit bicycle; One killed