शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमकांना ‘अल्टिमेटम’

By admin | Updated: December 10, 2014 00:49 IST

बुलडाणा पालिका प्रशासन अलर्ट : शहर परिसरात गुरुवारपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई.

बुलडाणा : विविध राजकीय पदाधिकार्‍यांच्या आशीर्वादाने बुलडाणा शहरात अतिक्रमण करणारे माफिया फोफावले आहेत. काहींनी निवडणूक आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन विविध चौकात तसेच शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून त्या जागेत दुकाने किंवा घरे तात्पुरते उभारून भाड्याने देण्याचा तसेच विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता; मात्र अतिक्रमणाचा गोरखधंदा बंद होणार असून, नगरपालिका प्रशासनातर्फे गुरुवारनंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुलडाणा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्याप्रमाणात अतिक्रमणात वाढ होत आहे. या अतिक्रमणाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण लयास गेले आहे. लोकसंख्या व शैक्षणिक संस्था वाढल्यामुळे शहरात व्यवसाय वाढले आहेत. त्यामुळे विविध चौकातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटण्यासाठी स्पर्धा लागली आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी चिखली रस्त्यावरील सक्यरुलर रस्त्यावरील अतिक्रमण काही प्रमाणात काढण्यात आले होते. त्यावेळी अनेक अतिक्रमणधारकांना नोटीसेस देण्यात आल्या होत्या. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही स्थगित केली. त्यानंतर सर्व प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात मग्न झाले. राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारीही निवडणुकीच्या कामाला लागले; मात्र काही राजकीय पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला नेहमीचा अतिक्रमणाचा व्यवसाय सुरूच ठेवला. उलट आचारसंहितेच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण सुरू केले आहे. शहरातील बर्‍याच भागातील अतिक्रमण यापूर्वीही काढण्यात आले होते; मात्र काही दिवस लोटताच पुन्हा अतिक्रमणधारकांनी आपली दुकाने थाटली. यामुळे कोणत्याही प्रकारचे लेखी न देता असे लाखो रुपयांचे व्यवहार दररोज पार पडतात. मात्र आता अतिक्रमणाचा धंदा बंद होणार असून, पालिकेतर्फे गुरुवारनंतर शहरातील विविध भागात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.