शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात जळगावचे दोन तरुण ठार

By admin | Updated: September 4, 2015 00:31 IST

रिधोरानजीक घटना ; खड्डय़ांमुळे अपघात!

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : जळगाव जामोद येथील दोन तरूण रिधोरानजीक पेट्रोलपंपासमोर झालेल्या ट्रक मोटारसायकल अपघातात ठार झाले. त्यामुळे जळगाव नगरावर शोककळा पसरली. जळगाव जामोद येथील प्रफुल उर्फ पप्पु तुपकरी (वय २६) व मुकेश कंकाळे पाटील (वय ३१) हे दोघे बुधवार २ सप्टेंबर रोजी अकोला येथे दुचाकी क्र.एमएच२८एएच-४३३१ खाजगी कामाकरीता गेले होते. सायंकाळी अकोल्यावरून जळगाव जामोदकडे येत असताना रिधोराजवळील पेट्रोलपंपासमोर त्यांची दुचाकी महामार्गावरील खड्डयात गेल्याने त्यांचे नियंत्रण सुटले. दरम्यान सदर दुचाकीला समोरून येणार्‍या डब्ल्यु.बी.२३ सी-५१४२ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. त्यात मुकेश पाटील हे जागीच ठार झाले. तर पप्पु तुपकरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथे रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने जळगाव नगरावर शोककळा पसरली आहे. पप्पु तुपकरी यांचे तीन महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. तर मुकेश पाटील यांना एक छोटा मुलगा आहे. सदर अपघात रस्त्यावरील खड्डयांमुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे.