शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दोन यंत्र पडले बंद

By admin | Updated: October 16, 2014 00:56 IST

खामगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी ७१ टक्के मतदान.

खामगाव (बुलडाणा): खामगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी आज शहरी आणि ग्रामीण भागात सरासरी ७१ टक्के मतदान झाले. मतदारसंघातील दोन गावांमध्ये ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली तर मोरगाव डिग्रस येथे दुपारी १२ पर्यंत नागरिकांनी म तदानावर बहिष्कार टाकला होता. या घटना वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान पार पडले.मतदारसंघातील मतदारांमध्ये सकाळपासूनच प्रचंड उत्साह दिसून आला. मध्यंतरात काही काळ मतदान प्रक्रिया थंडावली होती; मात्र सायंकाळी मोठय़ा संख्येने नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे शहर आणि परिसरात मतदानाची टक्केवारी वाढली. खामगाव म तदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१0 टक्के, १ वाजेपर्यंत ३६.६५ टक्के, ३ वाजेपर्यंत ४९.९२ टक्के तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८.१६ टक्के मतदान झाले होते.मतदारसंघातील वाहळा (ता. खामगाव) आणि वरुड (ता. शेगाव) येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना ऐनवेळी मतदान यंत्राने दगा दिला. दुपारी १ वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे या ठिकाणी काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली होती. दुसरे यंत्र बसविल्यानंतर उपरोक्त दोन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. खामगाव मतदार संघातील मोरगाव डिग्रस ता. शेगाव येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकला होता. दरम्यान, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर मतदानावरील बहिष्कार मागे घेतला. या ठिकाणी दुपारी २ वाजता मतदान सुरू झाले. 

*नावातील चुकांचा अनेकांना बसला फटका

नवीन मतदारांची नोंदणी करताना निवडणूक विभागाकडून गंभीर चुका झाल्या. नावात  बदलासह मतदार यादीतील फोटोही चुकीचे प्रकाशित झाल्यामुळे अनेकांना मतदानापासून  वंचित रहावे लागले. काही महिला मतदारांच्या पतीच्या नावाऐवजी त्यांच्या वडिलांच्या  नावाची नोंद करण्याचा पराक्रमही निवडणूक विभागाकडून झाला. यामुळे  शहरातील   बर्‍याच मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याचे चित्र दिसून आले. 

 

खामगाव मतदारसंघ

एकूण मतदान    २,६५,१८२

महिला        १,२३,५५६

पुरुष              १,४0,६२५

मतदान केंद्र          २९१