अस्वलाच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर

By Admin | Updated: June 15, 2014 00:44 IST2014-06-15T00:42:48+5:302014-06-15T00:44:24+5:30

अस्वलाने घरात प्रवेश करून केलेल्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जून रोजी रात्री दरम्यान मेहकर तालुक्यातील अंबाशी येथे घडली.

Two female serious attacks in Aswala attack | अस्वलाच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर

अस्वलाच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर

बुलडाणा : अस्वलाने घरात प्रवेश करून केलेल्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जून रोजी रात्री दरम्यान मेहकर तालुक्यातील अंबाशी येथे घडली.

मेहकर तालुक्यातील अंबाशी येथील व्दारकाबाई प्रकाश देशमुख वय ५५ आपल्या घरात झोपलेल्या असताना १३ जून रोजी रात्री दरम्यान एका अस्वलाने छतावरून घरात प्रवेश केला. यावेळी चवताळलेल्या अस्वलाने व्दारकाबाई यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर अस्वलाने घराच्या बाहेर पडून अंगणात असलेल्या सुलोचना लक्ष्मण देशमुख वय ५0 यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघांवर बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयावर उपचार सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरे जंगल परिसरातील गावात पाण्याच्या शोधात येत आहेत. या प्रकारातून नागरिकांवर जनावरांचे हल्ले वाढत आहेत. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Two female serious attacks in Aswala attack