शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर-दुचाकी अपघातात वडील ठार, मुलगी गंभीर

By admin | Updated: April 17, 2017 00:45 IST

नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली.

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल नांदुरा : मालवाहू ट्रेलर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार, तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरानजिक घडली. प्रकाश नारायण अंभोरे (वय ५५) रा.दुर्गानगर नांदुरा हे मुलगी पल्लवी सोबत मोटारसायकल क्र.एमएच २८ एडी ८९६५ ने दुर्गानगर येथे घरी येत असताना जळगाव खांदेशकडे जाणाऱ्या ट्रेलर क्र. एमएच ४६ बीबी ०५९५ ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रकाश अंभोरे यांचे शरीर अक्षरश: छिन्नविच्छिन्न झाले, तर मागे बसलेल्या मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर व बढे नामक इसमाने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी हलविण्यात आले. तर प्रकाश अंभोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णवाहिकेद्वारा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणला. या अपघातात जखमी झालेल्या पल्लवी अंभोरे हिचेवर खामगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पल्लवीचे पायावर शस्त्रक्रिया झाली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघातप्रकरणी अजय सीताराम धनोकार राहणार नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त क्रमांकाच्या ट्रेलर चालकाविरुद्ध अपराध नं.१३९/१७ कलम २७९, ३०४ अ, ३३७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राठोड करीत आहेत.राष्ट्रीय महामार्गावर झालेले अतिक्रमण तसेच वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या व वळण रस्त्याचा शासन दरबारी प्रलंबित असलेला प्रश्न यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून, नागरिक मृत्युमुखी पडत आहे. तरी या गंभीर बाबीकडे राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरचा प्रश्न निकाली काढावा, अशी सुज्ञ नागरिकांमधून मागणी होत आहे.